सोमवारपासून खासगी कार्यालय सुरू करण्यास परवानगी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Office.jpg)
मुंबई | राज्यात पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्यात टप्याटप्याने आर्थिक व्यवहार सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं. राज्य सरकारनं ३ जूनपासून लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात आता लॉकडाऊन नाही मिशन बिगीन अगेन सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. यात राज्यातील खासगी कार्यालय ८ जून पासून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर १० टक्क्यांची मर्यादा असणार आहे. ३ जूनपासून मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यात सम- विषम या तत्वावर दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं होतं. रस्त्याच्या एका बाजूची दुकानं एका दिवशी तर दुसऱ्या बाजुची दुकानं दुसऱ्या दिशी सुरू राहतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांचा गोंधळ होऊ नये यासाठी महापालिकेकडून वेळ ठरवून दिली जाणार आहे. तसंच ८ जूनपासून खासगी कार्यालय सुरू करण्यासही सशर्त परवागनी देण्यात आली आहे. मात्र, कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर १० टक्के मर्यादा असणार आहे.