सोनियांचं पत्र म्हणजे दबावतंत्र नाही- संजय राऊत
मुंबई – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कॅामन मुनीम प्रोग्रमची आठवण करून देणार पत्र लिहील.त्यानतंर महाविकासआघाडीत सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या.मात्र सोनिया गांधी यांनी लिहीलेल लिहिलेलं पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही. उलट त्यांनी या पत्रात किमान समान कार्यक्रमाशी संबंधित काही मुद्दे मांडले आहेत. त्याचं स्वागतच आहे, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना बॅकफूटवर आली का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
याविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात की,सोनिया गांधी यूपीएच्या चेअर पर्सन आहेत .हे सरकार जेव्हा तयार झाले त्यात कॉमन मिनीमम प्रोग्राम तयार झाला होता त्यात दलित शोषित यांच्यावर महाविकासआघाडी काम करेल हे ठरलं होते त्यामुळे यावर मुख्यमंत्री सुध्दा काम करत आहेत. अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांच्या पत्रावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली