Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सीएम अरविंद केजरीवाल यांचा निर्णय ; दिल्लीत दररोज डबल कोरोना टेस्ट होणार…
![Weekend lockdown announced in the capital Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Arvind-Kejariwal-1.jpg)
दिल्ली | दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाची संख्या वाढल्याचे निदर्शनात आल्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना चाचण्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीत दररोजच्या चाचण्यांची संख्या दुप्पट करण्याची घोषणा केली. सोशल मिडियावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दररोज 20 हजार चाचण्या घेतल्या जात आहेत, येत्या एका आठवड्यात 40 हजार चाचणी घेण्यात येणार आहेत.
पत्रकार परिषदेत दिल्लीतील कोरोना केसेसच्या परिस्थितीविषयी चर्चा करताना ते म्हणाले की, दिल्लीतील कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. 17 ऑगस्टपासून नवीन प्रकरणे १२००-१४०० च्या आसपास फिरत आहेत. कालच्या अहवालात १५४४ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. आज संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात १६९३ नवीन प्रकरणे समोर येतील.