सांगली : बिसूरला पुराचा वेढा ; साडेपाच हजार लोक अडकले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/3sangli_2015-1.jpg)
सांगली । प्रतिनिधी
सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मिरज पश्चिम भागातील काही गावांमध्ये दिसत आहे. सांगली जिल्ह्या्यातील बिसूर या गावाला सुद्धा पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.
गावची साडेपाच हजार लोकसंख्या या पाण्याच्या वेढ्यात अडकली आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी घुसले आहे. दत्त मंदिर परिसर, मुक्तीधाम स्मशानभूमीत सुमारे सहा फुट पाणी आहे. स्मशानभूमीच्या दक्षिण बाजूची भिंत काही प्रमाणात कोसळली आहे. पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढत आहेत. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेली वाहतूक पहाटेपासून पूर्ण बंद झाली. दत्त माळावरील नवीन वसाहत मात्र सुरक्षित आहे.
35 वर्षानंतर अग्रणी नदीला महापूर
दरम्यान ,दुष्काळी पट्ट्यातील जीवनदायी ठरणारी अग्रणी नदी पट्ट्यामध्ये गेली दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीने धोक्याची पातळी ओलांडून गावामधील शिवारामध्ये पाणी शिरले. पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांच्या सह महिलांची ही गर्दी झाली आबे.हिंगणगाव परिसरामध्ये अग्रणी नदीने केला कहर अजूनही पाणी वाढण्याची शक्यता पाणी पोचले गावातील स्टँडमधून हनुमान मंदिरा पर्यंत अशा प्रकारची घटना अंदाजे पस्तीस वर्षांपूर्वी झाली होती त्यानंतर आज 2020 मध्ये महापूर आला.