breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

‘सांगली बंद’ शिवसेने विरोधात नाही, भिडे गुरुजींची उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती

सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात येत असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी ‘सांगली बंद’ची हाक दिली आहे. भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

उदयनराजेंचा अपमान सहन करणार नाही, भिडे गुरुजींची उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती केली आहे. सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि महापौर संगीता खोत आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. देशाने आदर्श घ्यावा असं बंद पाळला पाहिजे असं संभाजी भिडे यांनी यावेळी सांगितलं. बंद काळात कोणत्याही प्रकारची हिंसा केली जाऊ नये, असे आवाहनही भिडे गुरुजींनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button