सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ; पेट्रोल-डिझेलची आजही दरवाढ
![Fuel price hike for the seventh day in a row in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/petrol-.jpg)
नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या दरात ३० पैसे प्रति लिटर अशी भाववाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत आज पेट्रोल ८६.९५ रुपये, तर डिझेल ७७.१३ रुपये लिटर दराने मिळत असूनदररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.
प्रमुख शहरांतील दर प्रति लिटर
मुंबई : पेट्रोल – ९३.४४ रुपये, डिझेल – ८३.९९ रुपये
दिल्ली : पेट्रोल – ८६.९५ रुपये, डिझेल – ७७.१३ रुपये
चेन्नई : पेट्रोल – ८९.३९ रुपये, डिझेल – ८२.३३ रुपये
कोलकाता : पेट्रोल – ८८.०१ रुपये, डिझेल – ८०.७१ रुपये