सरकार सतर्क आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाही – आरोग्यमंत्री
![Government is vigilant, no need to worry - Health Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/222222222222222.jpg)
नवी दिल्ली – जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाचा एक नवा प्रकार आढळून आला आहे. हा नवा प्रकार जास्त धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे जगाच्याबरोबरीने भारताचीदेखील चिंता वाढली आहे. मात्र ‘सरकार सतर्क असून चिंता करण्याची आवश्यकता नाही’, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनाचा नवीन प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. त्यामुळे तिथे लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे. तसेच या नव्या प्रकारच्या धोक्यामुळे जगातील अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. सौदी अरेबिया, कॅनडा या देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नेदरलँड आणि बेल्जिअमने ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.