संसद हल्ल्याला 19 वर्ष पूर्ण; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले शहीदांचे स्मरण
![Commitment for empowerment of traders: Prime Minister Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/modi.jpg)
नवी दिल्ली |
13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेला आज 19 वर्ष पूर्ण होत आहेत. 13 डिसेंबर 2001 च्या दुपारी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना जैश-ए-ंमोहम्मद च्या 5 दहशतवाद्यांनी पूर्ण तयारी सह संसद भवनात घुसले आणि गोळीबाराला सुरुवात केली होती. अचानक झालेल्या हल्ल्याचा जवानांनी ठामपणे प्रतिकार केला होता. यात 9 जवान शहीद जाले. मात्र या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे.
संसदेवर झालेल्या या हल्ल्याला आज 19 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “2001 साली या दिवशी संसदेवर झालेला हल्ला आम्ही कधीच विसणार नाही. संसदेचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण गमावलेल्या जवानांचे शौर्य आणि त्याग आमच्या लक्षात आहे. त्यांच्यासाठी भारत नेहमीच आभारी राहील.”
आवश्य वाचा- मोठी बातमी! टीआरपी घोटाळ्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या सीईओला अटक