breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

वैयक्तिक गोष्टी, हालचालींवर लक्ष ठेवणा-या पॉपुलर एपला गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले…

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने पॉपुलर मेसेजिंग एप टूटॉकला पुन्हा एकदा प्ले स्टोअरमधून हटलवे आहे. या एपद्वारे संयुक्त अरब अमीरात सरकारकडून लोकांवर लक्ष ठेवले जात होते, असा दावा केला जात आहे. यापूर्वीही या एपला डिसेंबरमध्ये एपल प्ले स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरमधून हटवले होते.

ज्यांनी हे एप इन्स्टॉल केले आहे. त्यांचा डेटा सुरक्षित नाही. कारण युएईकडून टूटॉक एपच्या माध्यमातून सर्वांवर नजर ठेवली जात आहे.यामध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक गोष्टी, हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय युजर्सच्या फोटो आणि इतर कॉन्टेटवरही लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे.

हे एप टेलीग्राम आणि सिग्नल एपसारखे काम करते. या एपला मिडल ईस्ट, यूरोप, अशिया, अफ्रिका आणि उत्तरी अमेरिकामध्ये अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसवर लाखोवेळा डाऊनलोड केले आहे, असं अमेरिकेच्या गुत्पचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, टूटॉक एपला ब्रीज होल्डिंग नावाच्या एका कंपनीने तयार केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button