breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

विधीमंडळाचे सर्व आमदार एकाच फ्रेममध्ये ; देवेंद्र फडणवीस मात्र गैरहजर

नागपूर | नागपूरमधील विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवासापासून शेतकरी कर्जमाफी, सावरकर तसेच सामनाच्या मुद्द्यावरुन गाजत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र आजच्या कामकाजाची सुरुवात होण्यापूर्वी सर्वपक्षीय आमदार फोटोसेशनसाठी एकत्र आले. पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेले, ज्येष्ठ आमदार फोटोसेशनसाठी एकत्र जमले. परंतु या फोटोसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे काही काळ देवेंद्र फडणवीसांच्या गैरहजेरीबाबत चर्चा झाल्याचेही पाहायला मिळाले.

महाविकास आघाडीचं हे पहिलेच अधिवेशन आहे. मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विरोधीपक्ष नेते आणि सर्वपक्षीय सदस्यांचं एकत्रित फोटोसेशन करण्याची विधीमंडळाची प्रथा-परंपरा आहे. ज्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा देत आंदोलन करतात, त्याच विधानभवनाच्या आवारात सर्वपक्षीय आमदार फोटोसेशनसाठी एकत्र येतात. याच परंपरेनुसार सर्वपक्षीय आमदार आज विधानभवनाच्या आवारात एकत्र आले आणि एक मनाने, एक दिलाने फोटोसेशन केलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button