वंचितच्या बंदला औरंगाबादेत हिंसक वळण; दोन बसच्या काचा फोडल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/vanchit-bandha-jan-20-abd-9-.jpg)
औरंगाबाद | महाईन्यूज
सीएए व एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडीनेमहाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र दुपारी १२ वाजेच्या दरम्यान बंदला हिंसक वळण लागत महावीर चौकाच्या पुढे एका सिटीबसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासोबतच पैठण-औरंगाबाद रोडवर गेवराई येथे एका बसवर अज्ञात लोंकांनी दगडफेक केलेली आहे. यात बसच्या काचा फुटलेल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ शहागंज, औरंगपुरा येथील दुकाने बंद ठेवण्यात आलेली होती. वंचितचे कार्यकर्ते सर्वाना बंदमध्ये सहभागी होण्याचे व व्यापारीपेठ बंद करण्याचे आवाहन करत होते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी फेरी काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलेले.
पैठण-औरंगाबाद रोडवरील गेवराई येथे नारायणगड – औरंगाबाद या बसवर अज्ञात लोंकांनी दगडफेक केली आहे. यात बसचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बसच्या काचा फुटल्या असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.