लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना खते उपलब्ध व्हावीत;जिल्ह्यात खत पुरवठ्याचे नियोजन: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/4-6.jpg)
कोल्हापूर । महाईन्यूज । प्रतिनिधी
सद्याच्या लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना रासायनिक खते वेळीच उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्ह्यात खत पुरवठा नियोजन सुरळीत करण्यात आले असून शेती व शेतीपूरक कामे शेतकऱ्यांनी वेळीच करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
शेती शेतीपूरक कामांमध्ये शेतीची मशागत करणे, लागवड करणे, पिकांच्या / फळझाडांच्या आंतरमशागतीची कामे करणे तसेच फळझाडे व इतर पिकांची काढणी व विक्री करण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, किटकनाशकांच्या उपलब्धतेसाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. शेतीसाठीची औजारे, मशिनरीची दुकाने सुरू ठेवण्याच्या तसेच स्पेअर पार्टस व विक्री पश्चात सेवा याकरिता संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागत गरजूंना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा अंतर्गत कृषी विभागाशी संबंधित कामे हाती घेण्यात येत असून मनरेगा अंतर्गत् कामामध्ये व्हर्मी कंपोस्ट उभारणी, नाडेप उभारणी, शेततळे खोदणे व फळबाग लागवडीच्या पूर्वतयारीची कामे सुरू करण्यात आल्याचेही श्री. वाकुरे म्हणाले.