Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राहुल गांधींसह प्रियंका गांधी हाथरसकडे रवाना, पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार
उत्तर प्रदेश | सलग दोन दिवसांतील सामूहिक बलात्कार प्रकरणांनी यूपीसह संपूर्ण देश हादरला आहे. दोन्ही घटनांतील पीडितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधींसह हाथरसच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार आहेत.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमध्ये येणार असल्याने, हाथरस जिल्ह्याची सीमा आज (1 ऑक्टोबर) पूर्णपणे सील करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.