Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राहुल आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवून परत माघारी पाठवलं…

मेरठ | महाईन्यूज
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या दोघांना मेरठमध्ये अडवण्यात आलं होत. मेरठ या ठिकाणी CAA आणि NRC विरोधात जे आंदोलन झालं त्यामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयाच्या भेटीसाठी हे दोघे जात होते. त्यावेळी त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलेलं आहे.
पोलिसांनी या दोघांचीही कार अडवली आणि त्यांना बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास सक्त नकार दिलेला आहे. CAA आणि NRC या दोहोंविरोधात देशभरात जनक्षोभ उसळलेला आहे. या दोन्ही कायद्यांना सात राज्यांमध्ये विरोध होतो आहे, तर आसाम तर याविरोधात पेटलेलं आहे व उत्तर प्रदेशातही या विरोधात पडसाद उमटलेले आहे.





