राज्यातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सकारात्मक पाऊल उचलणार!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/IMG-20200112-WA0089.jpg)
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या जिल्हा शिष्टमंडळाने घेतली भेट
सांगली | महाईन्यूज | प्रतिनिधी:
राज्यातील पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून सर्वसमावेशक नियम व जीआर होणे अत्यावश्यक आहे. पत्रकारांच्या सर्व समस्यांचे समूळ निराकरण करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सकारात्मक आहेत.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील शिष्टमंडळाने सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील, सहकार,कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांच्यासह खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिलभाऊ बाबर,आमदार सुमनताई आर.आर.(आबा) पाटील, माजी मंत्री व आमदार सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांबाबत चर्चा केली.
युनियनच्या राज्य अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निवेदन देऊन महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करणेत आली होती.लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट राज्याचे प्रतिनिधीमंडळ भेट घेणार आहे.याच पाश्वभुमीवर सांगली जिल्ह्यातील एनयुजेमहाराष्ट्रच्या जिल्हा पदाधिकारी यांनी सांगलीतील लोक प्रतिनिधींना निवेदन दिले.
राज्य अध्यक्ष करदेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके, जिल्हा संघटक देवानंद जावीर, ज्येष्ठ पत्रकार हमीदभाई शेख, आटपाडी तालुकाध्यक्ष नंदकुमार विभुते,कार्याध्यक्ष विक्रम भिसे, प्रसिद्धीप्रमुख बापूसाहेब नामदास, कडेगाव तालुकाध्यक्ष हेमंत व्यास आदि पत्रकारांचा या शिष्टमंडळात समावेश होता.