breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राजकारणात उलथा-पालथ, काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली भाजप नेत्यांची भेट

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर काही राज्यात राजकारणात उलथा-पालथ होण्याची स्थिती पाहायला मिळत आहे. कर्नाटक असं एक राज्य आहे की या दिवसात काँग्रेस पक्षातंर्गत गडबड सुरू असल्याचं जाणवत आहे. तसंच या राज्यात भाजप विधानसभेत बहुमताच्या जवळ देखील आहे. काँग्रेसचे नेते भाजप नेत्याच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे राज्यातल्या राजकारणात मोठी घटना घडण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेस नेते रमेश जारकीहोली आणि डॉ. सुधाकर यांनी रविवारी बंगळुरूमध्ये भाजप नेते एसएम कृष्णा यांच्या निवासस्थानी जाऊन भाजप नेते आर. अशोक यांची भेट घेतली. रमेश जारकीहोली यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं की, ही कोणत्याही प्रकारची राजकीय बैठक नव्हती. आम्ही कर्नाटकात भाजपच्या विजयानंतर एसएम कृष्णा यांचं अभिनंदन करू इच्छित होतो. ही एक शिष्टाचार भेट होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button