breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मोस्ट वाँटेड हवाला किंग नरेश जैन याला अटक

नवी दिल्ली | अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन, नेदरलँड आणि संयुक्त अरब अमिरातीसह ६ देशांना हवा असलेला मोस्ट वॉंटेड हवाला किंग नरेश जैन याला अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने अटक केली आहे. भारतातील हवाला रॅकेटमध्ये आजवर केलेल्या कारवाईतील ईडीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात त्याला ही अटक झाली आहे. नरेश कुमार जैन याने ५५० पेक्षा अधिक बोगस कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यातून त्याने व्यवसायिक, अंमली पदार्थांचे तस्कर आणि गुन्हेगारी जगताच्या वतीने सुमारे एक लाख कोटींपेक्षा अधिक रुपयांचे हवाला व्यवहार केले आहेत.

एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला बुधवारी ताब्यात घेतल्यानंतर रात्री अटक केले, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ६२ वर्षांचा नरेश जैन मनी लॉन्ड्रिंग आणि आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याने त्यासाठी ५५४ बोगस कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्याची ९४० संशयास्पद बँक खाती आहेत. १ लाख ७ हजार कोटींच्या मनी ट्रान्सफर प्रकरणात तो गुंतला आहे. हवाला रॅकेटमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील काही बडे उद्योगपतीही गुंतलेले आहेत. गुन्हेगारी जगताबरोबरच अंमली पदार्थाचे माफिया या प्रकरणात आहेत. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१८मध्ये आणि एनसीबीने केलेल्या तक्रारीनुसार नरेश जैन आणि त्याच्या साथीदाराला ईडीने अटक केली आहे. २००९ मध्येही पीएमएलए प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती.

राजधानी दिल्लीतील रोहिणी आणि विकासपुरी भागातील जैनच्या कुटुंबांची निवासस्थाने व कार्यालयांवर ईडीने छापे घातले आहेत. त्याच्या साथीदाराच्या घरावरही छापे घातले आहेत. त्यात त्यांनी कागदपत्रे, संगणक, पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. दुबई, हॉंगकॉंग आणि सिंगापूर अशा विविध देशांमध्ये त्याच्या असलेल्या विदेशी बँकांतील ३३७ बँक खात्यांची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button