Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होणार; महाराष्ट्राला काय मिळणार?

नवी दिल्ली | महाईन्यूज

संसदेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्यावर्षी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. देशावर असलेलं मंदीचं सावट हे या अर्थसंकल्पासमोरील महत्वाचं आव्हान असणार आहे. इनकम टॅक्समध्ये काही बदल होतात का? याकडे मध्यमवर्गीयांचे लक्ष लागलं आहे. ग्रामीण, कृषी क्षेत्रासाठी मोदी सरकार कोणत्या नवीन योजना आणणार का? हे पाहणं गरजेचे ठरणार आहे.

सकाळी ११ च्या सुमारास लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात होईल. गेल्या १० वर्षात सर्वाधिक घटलेला जीडीपी दर, वाढती बेरोजगारी हे मोदी सरकारसमोर आव्हान आहे. महाराष्ट्राला काय मिळणार? तसेच बजेटमधून रेल्वे अर्थसंकल्पातून मुंबईकरांना दिलासा मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला अर्थसंकल्पातून मिळणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button