Breaking-newsताज्या घडामोडी
‘मी इथं येईन’ असं म्हणालो नव्हतो, पण यावं लागलं – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई – ‘मी इथं येईन’ असं म्हणालो नव्हतो, तरीही मला यावं लागलं आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
देवेंद्र फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर उद्धव यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, त्यावेळी ते बोलत होते. तसेच माझ्या आमदारांना मी सांगितलं होतं जे करायचं ते स्पष्ट करायचं, अंधारात काही करायचं नाही,’ असं म्हणत ठाकरे यांनी फडणवीसांना टोलाही लगावला
ते पुढे म्हणाले की, ‘आपण तर गेले २५-३० वर्षे एकत्र आहोत. मित्र होते ते विरोधात बसलेत. विरोधी पक्ष सोबत आलेत. या अर्थाने खरे तर विरोधक कुणीच नाही. विरोधी पक्षनेता माझा मित्रच आहे, तेव्हा दोघांमध्ये अंतर ठेवायला नको. कोणाचे वाभाडे काढण्याची आपली परंपरा नाही,’ असं आवाहनही केलं.