Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
मिरज कोविड रुग्णालयातील 50 कर्मचारी कोरोनाबाधित
सांगली – सांगली जिल्ह्यातील दिवसागणिक कोरोना बधितांचा आकडा 1 हजाराच्या पार जात असताना आता मिरज कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर,नर्स देखील कोरोनाच्या विलख्यात सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. मिरज कोविड हॉरि लमधील सुमारे पन्नास कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत यापैकी काही जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत तर काही जणांना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे.