मालदिवमध्ये अडकलेल्या 698 भारतीय नागरिक आणि 19 गर्भवती महिलांना घेऊन INS जलाश्व युद्धनौका कोची बंदरात दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Untitled-34.png)
कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन २४ मार्चला जाहीर करण्यात आला. त्यामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले. याच भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने ‘वंदे भारत मिशन’ ही मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत ऑपरेशन समुद्र सेतू देखील सुरू करण्यात आले. या मोहीमेमध्ये नौदलाची तीन युद्धनौका आणि ६४ विमानाचा वापर करून ७ मे ते १३ मेपर्यंत १४ हजारहून अधिक परदेशी अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले जाणार आहे. दरम्यान काल म्हणजे 10 मे ला याच मोहीमेचा भाग म्हणून मालदिवमध्ये अडकलेल्या ६९८ भारतीय नागरिक आणि १९ गर्भवती महिलांना घेऊन आयएनएस जलाश्व युद्धनौका कोची बंदरात दाखल झाली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/3359f78450506daf7e59cb0b848c17b2.jpg)
या सर्व अडकलेल्या भारतीयांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. नौदलांची आयएनएसची जलाश्व युद्धनौका ही मालदिवची राजधानी माले बंदरात शुक्रवारी दाखल झाली होती. ती काल कोची बंदरात परतली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/905531-ins-jalashwa-1024x576.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/PTI08-05-2020_000274B-1588964231.jpg)
मालदिवमध्ये २० हजारहून अधिक भारतीय नागरिक आहे. यामधील काही नागरिकांना भारतात परत आणले जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणले जात आहे. याशिवाय दुबईत अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी देखील आयएनएस शार्दुल ही युद्धनौका लाँच करण्यात आली आहे.