Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा प्रयत्न करु नये : छत्रपती संभाजीराजे भोसले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/4.jpg)
कोल्हापूर । मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही, अशी खंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.