Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मन की बात! भारताने अनेकदा मैत्रीचा हात पुढे केला, पण पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला: पंतप्रधान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/modi-mann-ki-baat.jpg)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (26 जुलै) रेडियो वर ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे आज (26 जुलै) कारगील विजय दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. “भारताने पाकिस्तानसोबत अनेकवेळा मैत्री करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला”, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला आहे.
Tune in to this month’s #MannKiBaat. https://t.co/0PPisEWaHG
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2020