भोसरीत आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली कोरोनाची लस; आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती
![Corona vaccine given to health workers in Bhosari; Presence of MLA Mahesh Landage](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Mahesh-Landge-Corona-Pcmc.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
शहरात कोरोनाच्या लसीकरणाला शनिवारी (दि.१६) सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये लसीकरण होणार आहे. दिवसभरात आठ केंद्रावर वैद्यकीय क्षेत्रातील ८०० जणांना लस दिली जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना सर्वप्रथम लस देवून लसीकरणाची सुरुवात झाली आहे. या वेळी भोसरी येथे आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत हि लस देण्यात आली. आपल्या परिचित डॉक्टर, परिचारिका यांना त्वरित महापालिकेच्या अधिकृत ऍप पीसीएमसी स्मार्ट सारथी वर रजिस्ट्रेशन करण्यास सांगावे, असे आवाहन या वेळी आमदार महेश लांडगे यांनी केले.
लस घेण्यापूर्वी लस टोचक अधिकारी माहिती देतात. लस टोचल्यानंतर त्यांना अर्धा तासासाठी निरीक्षक कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात येते. कोणताही त्रास होत नसल्यास घरी सोडले जाते. तसेच दुस-या डोसबाबत माहिती दिली जाते. एक महिन्याने तो डोस दिला जातो. आरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्याकडून कोविड 19 लसीकरणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला १५ हजार डोस प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लस टोचण्यात येणार आहे. महापालिका, खासगी रुग्णालयातील अशा १७ हजार ७९२ आरोग्य सेवा देणा-या लाभार्थींची महापालिकेकडे नोंदणी झालेली आहे.
महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये आज लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दिवसभरात एका केंद्रावर १०० जणांना लस टोचण्यात येणार आहे. अशा ८ केंद्रावर एकूण ८०० जणांना दिवसभरात लस देण्यात येणार आहे. तर, एक महिन्याने दुसरा डोस दिला जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. त्यानुसार भोसरी येथे देखील आरोग्य कर्मचाऱ्यांना व कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. या वेळी आमदार महेश लांडगे उपस्थित होते. महापालिकेच्या सारथी ऍपवर नोंदणी करण्याचे आवाहन या वेळी आमदार लांडगे यांनी केले.
‘या’ ८ केंद्रावर लसीकरणाला सुरुवात..
लसीकरणासाठी यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय या ८ केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे.