बोगस एफडीआर प्रकरणातील अन्य १३ ठेकेदारांवरही गुन्हे दाखल करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा इशारा
![File charges against 13 other contractors in bogus FDR case; Warning of Nationalist Students Congress](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/yash-sane.jpg)
पिंपरी |प्रतिनिधी
महापालिकेची विविध कामांच्या निविदा घेताना एफडीआर व बँक गॅरेंटी घेतली जाते. अशी बँक गॅरेंटी व एफडीआरच्या बनावट पावत्या देऊन महापालिकेची फसवणूक करणार्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पाच व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन, पण अन्य १३ ठेकेदारांवरही गुन्हे दाखल करावेत, अन्यथा महापालिका भवनासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश दत्ता साने यांनी दिला आहे.
महापालिकेची विविध कामांच्या निविदा घेताना एफडीआर व बँक गॅरेंटी देणाऱ्या पाटील अँड असोसिएटचे मालक सुजित सूर्यकांत पाटील, कृती कन्स्ट्रक्शनचे मालक विशाल हनुमंत कुर्हाडे, एस. बी. सवईचे मालक संजय बबन सवई, वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे, डी. डी. कन्स्ट्रक्शनचे मालक दिनेश मोहनलाल नवानी या पाच ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महापालिकेच्या कर्मचार्यांनी फिर्याद दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागामधून स्थापत्य विषयक कामांच्या निविदा निघतात. त्यामध्ये सर्वात कमी दर घेणार्या ठेकेदाराला निविदा दिल्या जातात. निविदेच्या अनुषंगाने त्यांच्याकडून एफडीआर व बँक गॅरेंटी घेतली जाते.मात्र, अनेकांनी कामे घेताना बनावट बँक गॅरेंटी दिल्याचे उघड झाले आहे. याबाबत आता पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी बनावट बँक गॅरेंटी देणार्या मध्ये बँकेचे अधिकारीही सहभागी असण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर या प्रकरणातील अन्य १३ ठेकेदारांवरही गुन्हे दाखल करावेत. अन्यथा महापालिका भवनासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश दत्ता साने यांनी दिला आहे.