बेरुतमध्ये झालेला भीषण स्फोट बघून लोकांच्या काळजाचे ठोके चुकले; पहा व्हिडीओ

लेबनानची राजधानी बेरुतमध्ये झालेला भीषण स्फोट बघून अक्षरश: लोकांच्या काळजाचे ठोके चुकले. या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे राजधानी शहरातील अनेक भाग हादरून गेलाय. शहरात सर्वत्र काळ्या धुराचे लोट दिसत होते. बेरुतमधील पत्तनच्या त्या परिसरात स्फोट झाले जेथे फटाके ठेवले जात होते अस म्हटलं जातय.
बेरुतच्या पत्तनजवळ हा स्फोट झाला. घटने मोठं नुकासानही झालं आहे. घटनेनंतर काही व्हिडीओ समोर आले, त्यामध्ये गाड्या आणि इमारतींना आग लागल्याचं दिसून येत आहे. धूर हळूहळू सर्वत्र पसरत आहेत आणि अचानक स्फोट होत असल्याचंही दिसून येत आहे.
भीषण स्फोटानंतर लेबनानमधील भारतील दुतावासाने 01741270, 01735922, 01738418 हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. कोणत्याही भारतीयाला मदत हवी असल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता असं भारतीय दुतावासाने ट्वीटमध्ये म्हटलंय.





