breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

बीडमध्ये रेशनची साठेबाजी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

बीड | लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना पोटभर अन्न मिळेल, या भावनेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज सरकार स्वस्त धान्य दुकानात अन्न-धान्य उपलब्ध करुन देत आहे. तर दुसरीकडे काही व्यापारी रेशन मालाची साठेबाजी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशाच रेशन मालाची साठेबाजी करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजप नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

बीड पोलिसांनी काल (बुधवार) रात्री उशीरा ही धडक कारवाई केली. संपूर्ण महाराष्ट्रात हे नेटवर्क सक्रीय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई शहरालगत पांढरवाडी रोडवरील राजवीर पंपाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये रेशनच्या धान्याचा साठा आढळून आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी 6 ट्रकसह 450 पोते गहू, 190 पोते तांदूळ व 20 पोते साखर जप्त केली आहे. किमान संकटकाळात तरी स्वस्त धान्य दुकानावरील माल गरजूंपर्यंत पोहोचावा, अशी मागणी होत असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी छापा टाकलेले गोडाऊन भाजप कार्यकर्ता अरुण म्हस्के यांच्या मालकीचं आहे. या प्रकरणी अरुण म्हस्केविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button