बापरे! तब्बल 8 महिन्यांनंतर उत्तर कोरियात घुसला कोरोना! पहिला रुग्ण सापडताच किम जोंग यांनी घेतला मोठा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/images-52.jpeg)
सिओल: जगभरात एक कोटींहून अधिक कोरोनोबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. हा आकडा दिवसेंदिवस अगणित वाढत आहे. कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान शहरातून झाल्याचे पुरावे काही देशांना सापडले आहेत, त्यानुसार नोव्हेंबरमध्ये वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मात्र या सगळ्यात जगाच्या पाठीवर असेही देश होते, जेथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नव्हता. मात्र उत्तर कोरियात मात्र कोरोनाचा पहिला रुग्ण तब्बल 8 महिन्यांनी सापडला आहे.
पहिला रुग्ण सापडताच किम जोंग प्रशासनाने सीमेवरील केसनॉंगमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की, कोरोनाबाधित रुग्ण तीन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाला गेला होता, आता तो बेकायदेशीरपणे उत्तर कोरियात परतलेला आहे. या व्यक्तीस अधिकृतपणे कोरोना रुग्ण घोषित करण्यात आला आहे, त्यामुळे हा उत्तर कोरियातील पहिला कोरोना रुग्ण असेल.