बजाज कंपनीतील ७९ कोरोनाची लागण, दोघांचा मृत्यू…
!["The third wave of corona has hit Nagpur"; Guardian Minister warns Nagpurkars, says](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/200320110619-coronavirus-animation-super-tease-1.jpg)
औरंगाबाद | कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. औऱंगाबादमधील वाळूज भागातील बजाज कंपतनीतील ७९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आता ही कंपनी पुढील दोन दिवस म्हणजे शनिवार, रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात कंपनीचे निर्जुतुकीकरण केले जाणार आहे. दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार असून सोमवारी मोजक्याच कर्मचाऱ्यांना बोलवण्यात येणार असल्याचे बजाज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बजाजनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून रुग्ण संख्या वाढत होती त्यामुळे प्रशासनही हैराण होते. रुग्ण संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पाहणी केली होती. शुक्रवारी ते बजाज नगर भागातच दौर्यावर होते.