Breaking-newsताज्या घडामोडी
फेक व्हिडीओने महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका – मुख्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Udhav-Thakare-5.jpg)
मुंबई | राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करणाऱ्यांचे आभार मानले. “महाराष्ट्राच्या एकीला कोणी नख लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर सहन करणार नाही, जाणीवपूर्वक चुकीचे व्हिडीओ पसरवू नका, त्यांच्यावर कारवाई करु,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी हात जोडतोय, धन्यवाद देतोय, मी माझ्या आवाहनामध्ये नेहमी विनंती करतोय, कृपा करुन असे शब्द वापरतोय हे शब्द केवळ आपल्यासाठी आहेत. माझ्या तमाम बंधू, भगिनी आणि माता जे संयम आणि शिस्त पाळत आहेत धैर्य दाखवत जिद्दीने लढत आहेत त्यांच्यासाठी वापरतोय,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.