प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवालांची मुलगी असल्याचा दावा, हक्काचं बालपण नाकारल्याने 50 कोटींच्या मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Anuradha-Paudwal.jpg)
तिरुवनंतपुरम | केरळमधील तिरुवनंतपुरम येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय करमला मोडेक्स या महिलेने प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे. तसेच याबाबत जिल्हा कौटुंबिक न्यायालयामध्ये खटला देखील दाखल केलाय. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अनुराधा पौडवाल यांनी 1974 मध्ये आपला जन्म झाल्यानंतर केवळ 4 दिवसांची असताना पालक आई-वडिल पोन्नाचन आणि एग्नेस यांच्याकडे आपल्याला सोपावल्याचा दावा मोडेक्स यांनी आपल्या याचिकेत केला आहे.
करमला मोडेक्स म्हणाल्या, “अनुराधा पौडवाल यांनी पार्श्वगायनाचं खूप काम बाकी असल्याचं कारण सांगत लहान मुलाला सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली होती. त्यावेळी त्यांनी पद्मश्री आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित अनुराधा पौडवाल यांनी संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी लग्न केलं होतं. करमला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, “जवळपास 4-5 वर्षांपूर्वी माझे पालक वडील पोन्नाचन यांनी मृत्यू होण्याआधी माझी जन्मदाती आई अनुराधा पौडवाल असल्याचं मला सांगितलं. मी 4 दिवसांची असताना मला माझे पालक पोन्नाचन यांच्याकडं सोपवण्यात आलं. पोन्नाचन त्यावेळी महाराष्ट्रात सैन्यात तैनात होते. त्यांची अनुराधा पौडवाल यांच्याशी मैत्री होती. काही काळाने त्याची केरळमध्ये बदली झाली.”