breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पेट्रोल-डिझेल नंतर आता मोबाइलही महागले

कोरोनामुळे देश हादरुन गेला असतानाच देशातील नागरिकांना आणखी एका संकटाला सोमार जाव लागणार आहे…सकाळी पेट्रोल-डिझेल तीन रुपयांनी महागल्यानंतर सायंकाळी जीएसटी समितीच्या बैठकीनंतर मोबाइलवरील जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरुन १८ टक्के केल्याची घोषणा करण्यात आली. शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी समितीची ३९ वी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 

जीएसटीचे दर १२ टक्क्यांवरुन वाढवून १८ टक्के केल्यामुळे मोबाइल फोन महागणार आहेत. कोरोना विषाणूच्या आधीच याच्या किमती वाढल्या आहेत. चीनवरुन होणारा पुरवठा प्रभावित झाल्यामुळे बहुतांश ब्रँडचे मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट आधीच महाग झाले होते. 

जीएसटी समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आता काड्याच्या पेटीवर १२ टक्के कर लागेल. पूर्वी हाताने तयार केलेल्या काडी पेटीवर ५ टक्के आणि इतरांवर १८ टक्के कर लागत असत. 

त्याचबरोबर एअरक्रॉफ्टच्या देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) सेवेवर जीएसटीचे दर १८ टक्क्यांवरुन कमी करुन ५ टक्के करण्यात आले आहे. याचा अर्थ भारतात एमआरओ सेवा वाढवण्यावर भर देणे आहे. भारतात या सेवेचा अभाव आहे. कारण विमान कंपन्यांना मोठा खर्च हा विमानांच्या देखभालीवर करावा लागतो. कारण त्यांना आपली विमाने विदेशात पाठवावी लागतात. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button