पेट्रोल डिझेलचे दर स्थिर राहिल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-231.png)
जागतिक कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमतींमधील घसरण कायम आहे. सोमवारी खनिज तेलाचा भाव १० टक्क्यांनी कोसळला होता. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी दरात कपात करणे टाळल आहे. शनिवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले होते. त्यामुळे इंधन दरात ३ रुपयांची वाढ झाली होती. खनिज तेलात भरमसाठ घसरण होऊन देखील पेट्रोल डिझेल दर स्थिर राहिल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.
जागतिक बाजारात खनिज तेलाचा भाव २९ डॉलर प्रती बॅरल खाली आला होता. त्याचे परिणाम आज देशांतर्गत बाजारात उमटतील, अशी शक्यता होती. मात्र कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर ‘जैसे थे’च ठेवले. सोमवारी पेट्रोल १५ पैसे आणि डिझेल १६ पैशांनी स्वस्त झालं होतं. सध्याचा इंधन दर हा १४ महिन्यांचा नीचांकी दर आहे.
आज मुंबईत पेट्रोलचा दर प्रती लीटर ७५.३० रुपये आहे. दिल्लीत ६९.५९ रुपये आहे. चेन्नईत ७२.२८ आणि बंगळुरूत ७१.९७ रुपये आहे. मुंबईत डिझेलचा दर ६५.२१ रुपये आहे. दिल्लीत ६२.२९ रुपये, चेन्नईत ६५.७१ रुपये आणि बंगळुरूमध्ये ६४.४१ रुपये आहे.