breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांचा गुगलवर मक्तेदारीचा आरोप; कोणतीही नोटीस न देता गुगलने पेटीएमवर कारवाई केल्याचा दावा

गुगलने पेटीएमला प्ले स्टोरवरून हटवल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. मात्र काही तासातच हे अ‍ॅप प्ले स्टोरवर परतले. गुगलच्या कारवाईमुळे नाराज झालेले पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी आता गुगलवर मक्तेदारीचा दुरुपयोग करण्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, गुगलने आपल्या पेमेंट बिजनेसला वाढविण्यासाठी आपल्या मक्तेदारीचा दुरुपयोग केला व चुकीच्या पद्धतीने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

पेटीएम कंपनीने काहीही चुकीचे केलेले नसून. शर्मा यांनी पेटीएमच्या 30 कोटी ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी दावा केला की, गुगलने नोटीस देण्याआधीच पेटीएमवर कारवाई केली.

पेटीएमचे संस्थापक म्हणाले की, त्यांच्याकडे पॉवर आहे आणि ते आम्हाला त्रास देत आहे. गुगलने हे स्वतःला फायदा पोहचवण्यासाठी आणि पेटीएमला नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखण्यासाठी असे केले. दरम्यान, गुगलचे पेमेंट अ‍ॅप गुगल पे आणि पेटीएममध्ये मोठी टक्कर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button