पॅन कार्डनंतर आता मतदार ओळखपत्रही आधारसोबत लिंक करण्याचा नवा नियम…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-114.png)
पॅन कार्ड आधार लिंक सक्तीचं झाल्यानंतर आता मतदार ओळखपत्रही आधारसोबत लिंक होणार आहे. याबाबत कायदा मंत्रालय विधेयक तयार करत असून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Aadhaar-1200x560-1-1024x478.jpg)
मतदार ओळखपत्र हे आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी आधार कायदा आणि लोकप्रतिनिधीत्व कायद्यात बदल करावे लागणार आहे. मतदारांचा डेटा लीक होऊ नये आणि डेटाच्या सुरक्षेबाबत कायदा मंत्रालय आणि निवडणूक आयोगात डिसेंबर महिन्यात बैठक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबतचे विधेयक आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशात मांडण्यात येणार असल्यााची माहिती कायदा मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. नव्या मतदारांसह जुन्या मतदारांचे आधार कार्डही त्यांच्या मतदार ओळखपत्रासोबत लिंक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/hfdejBDGcPdZNVw-800x450-noPad.jpg)
कायदा मंत्रालयाने मतदारांचा डेटा सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांबात बाबत सप्टेंबरमध्ये विचारणा केली असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने दिली. आयोगाने कायदा मंत्रालयाकडे याबाबतचा एक सविस्तर माहिती सादर केली आहे. मात्र, त्यानंतर कोणतीही सूचना माहिती समोर आली नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. कायदा मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. निवडणूक कायद्यात लवकरच बदल होण्याची शक्यता या अधिकाऱ्याने वर्तवली.