पाच महिन्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सात दिवसांसाठी ‘2-जी’ इंटरनेट सेवा चालु
जम्मू-काश्मीर | महाईन्यूज
केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरध्ये जवळपास पाच महिन्यानंतर जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाइल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आलेली आहे. मात्र ही सुविधा केवळ पोस्टपेड मोबाइलवरच उपलब्ध असणार आहे. याचबरोबर हॉटेल, रुग्णालय व निगडीत संस्थामध्ये ब्रॉडबॅण्ड सेवा देखील सुरू करण्यात आलेली आहे. ही सुविधा उधमपुर, कठुआ, सांबा व रियासी या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणार आहे. या संबंधीचा आदेश १५ जानेवारीपासून सात दिवसांपर्यंत लागू असणार आहेत.
मंगळवारी गृह विभागाच्यावतीने यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आपल्या आदेशात गृहविभागाकडून सांगण्यात आले आहे की, काश्मीर विभागात अतिरिक्त ४०० इंटरनेट कियोस्क स्थापले जातील. इंटरनेट सेवा देणारे आवश्यक सेवा देणाऱ्यासर्व संस्था, रुग्णालय, बँकाबरोबच शासकीय कार्यालयात ब्रॉडबॅण्ड सुविधा देतील.