Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, चौघांचा मृत्यू
![Pakistani army helicopter crashes, killing four](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/pak-crash-4-daeth.jpg)
कराची – पाकिस्तान लष्कराच्या एका हेलिकॉप्टर अपघात झाला असून हे हेलिकॉप्टर गिलगिट-बाल्टिस्तान येथे कोसळले आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली. एका मृत सैनिकाचा मृतदेह लष्करी रुग्णालयाकडे नेत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे हे हेलिकॉप्टर कोसळले. आयएसपीआरच्या स्टेटमेंटमध्ये हे म्हटले आहे.
दोन सैनिकांसह मेजर रँकचा वैमानिक आणि सह वैमानिक या अपघातात ठार झाले. हेलिकॉप्टर ज्या भागात कोसळले, त्या ठिकाणी जमिनीवर कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. आयएएनएसने हे वृत्त दिले आहे.
दुर्गम भागात ज्या ठिकाणी मानवी वस्ती नाहीय, अशा ठिकाणी हा अपघात झाला असे सूत्रांनी सांगितले. अपघातानंतर लष्करी टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तिथून पाच मृतदेह ताब्यात घेतले.