breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाकमध्ये 100 लोकप्रतिनिधी कोरोना बाधित, सत्ताधारी…

इस्लामाबाद | पाकिस्तानात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. देशात आतापर्यंत १.६० लाखाहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत संसर्गामुळे तीन हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला. परंतु कोरोनाने पाकिस्तानच्या संसदेवर हल्लाबोल केला आणि सत्ताधारी पक्षापासून विरोधी पक्षांतील दिग्गज नेते, मंत्र्यांना शिकार करण्यास सुरुवात केली. गेल्या काही आठवड्यांतच येथे १०० हून जास्त खासदार-आमदार बाधित झाले. एकूण संख्येच्या सुमारे १० टक्के एवढे बाधितांचे प्रमाण आहे.

कोरोनाने बाधितांमध्ये हायप्रोफाइल नेत्यांमध्ये दोन माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी, शाहिद खाकन अब्बासीदेखील आहेत.त्यांच्याशिवाय रेल्वेमंत्री शेख रशीद, सभापती असद कैसर, संसदेतील विरोधी नेते व नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ, गृहराज्यमंत्री शहरयार खान आफ्रिदी यांनाही संसर्ग झाला. पाकिस्तानच्या संसदीय सचिवालयानुसार ३४२ सदस्यांच्या संसदेतील एक तृतीयांशहून जास्त सदस्यांना कोरोनाने ग्रासले आहे. अनेक खासदार व नेत्यांनी अद्याप बाधित असल्याची माहिती दिलेली नाही.  अनेक नेते व मंत्री तर स्वत:हून क्वॉरंटाइन झाले आहेत. त्यांच्याशिवाय संसदेचे ४० कर्मचारीदेखील बाधित आहेत. पाकिस्तानात संसर्गाच्या दृष्टीने आवश्यक नियमांचे पालन करण्यात संसद सदस्यांमध्ये प्रचंड अनास्था दिसून येते. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे, असे सांगितले जाते. देशातील सामान्य नागरिकही संसर्गाने हादरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button