breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पकडलेल्या भारतीय वैमानिकांचा पाककडून व्हिडिओ प्रसिध्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/3india_pilot.jpg)
रावळपिंडी – पाकिस्तानने दोन भारतीय वैमानिकांना आज (बुधवार) अटक केली. एक वैमानिक जखमी असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे तर दुसऱा वैमानिकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये डोळे व हात-पाय बांधलेल्या वैमानिकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ‘माझे नाव विंग कमांडर अभिनंदन. माझा सर्व्हिस क्रमांक 27981. मी हवाई दलाचा वैमानिक असून, माझा धर्म हिंदू आहे,’ असे या व्हिडिओमधून दाखवले जात आहे. शिवाय, त्यांच्याकडून माहिती वदवून घेतले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तानने पकडलेला दुसरा वैमानिक जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे.