पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल व राहुल गांंधी यांंचा प्रणब मुखर्जींचे अंंत्यदर्शन घेतानाचा ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/PB.jpg)
नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे सोमवारी 31 ऑगस्ट रोजी निधन झाले. प्रणब मुखर्जी यांंना कोरोनाची सुद्धा लागण झालेली असल्याने त्यांंचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांंच्या हस्ते अगदी कमी लोकांंच्या उपस्थितीत सोशल डिस्टंंसिंग पाळत काल लष्करी इतमामात त्यांंच्या पार्थिवाचा अंत्यविधी पार पडला. या पुर्वी दिल्लीतील राजाजी मार्ग येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणलेले होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंंद यांंच्या सहित अनेक मान्यवरांनी प्रणब मुखर्जी यांंचे अंत्यदर्शन घेतले. या वेळेचे अनेक फोटो सोशल मीडियावर आपण पाहिले असतील मात्र या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीचे मुख्यमंंत्री अरविंंद केजरीवाल व कॉंग्रेस नेते राहुल गांंधी यांंच्या फोटोंंचा एक कोलाज तुफान व्हायरल होत आहे, काय आहे याचं कारण आपणच पाहा…
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे प्रणब मुखर्जींना श्रद्धांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट केलेला आहे. धर्माचे ठेकेदार म्हणून मिरवणाऱ्यांचा ना धर्माशी काही संबंध आहे ना संस्कृतीशी ना ज्ञानाशी. बाकी सारं काही फोटोत दिसत आहे, अशी कॅप्शन श्रीनेत यांनी या फोटोला दिलेली आहे. या फोटोमध्ये आपण पाहु शकता की राहुल गांधी यांंनी श्रद्धांजली वाहताना पायात चप्पल बूट घातलेले नाही, तर याउलट नरेंद्र मोदी व अरविंंद केजरीवाल यांंनी पादत्राणे घातलेले आहेत. यावरुनच संस्कृती आणि धर्म अशा मुद्द्यांंना हात घालून श्रीनेत यांंनी टीका केलेली आहे.