Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधानांची मोठी घोषणा ; लॉकडाऊनच्या कालावधीत ३ मेपर्यंत वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Modi_PTI.jpeg)
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
करोना हॉटस्पॉट वाढले नाही तर नियम शिथील करण्यात येतील, असा दिलासाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिलाय. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचं मूल्यांकन केलं जाणार आहे. जे प्रदेश करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथील केले जातील, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज देशातील करोनाबाधितांची संख्या १०३६३ वर पोहचली आहे. यामध्ये ७६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यातील सध्या ८९८८ रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.