न्यूझीलंडमध्ये मशिदीत गोळीबार, 40 जणांचा मृत्यू; तर, 20 जण गंभीर
न्यूझीलंडमधील मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी ही माहिती दिली आहे. ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार झाला आहे. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार झाला आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केलं होतं.
पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन पुरुष एका महिलेचा समावेश आहे. ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली असून ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस प्रमुख माईक बुश यांनी दिली.
Jacinda Ardern,NZ Prime Minister on shooting at a Mosque in Christchurch: This is one of New Zealand's darkest days. It was an unprecedented act of violence. Police has apprehended a person, but I don't have further details of him yet. pic.twitter.com/xzTHBjk4Xq
— ANI (@ANI) March 15, 2019
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे मशिद अल नूर येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम जमलेले होते. यामध्ये बांगलादेश क्रिकेट संघदेखील होता. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू सुरक्षित आहेत.
AFP News Agency: Armed police in New Zealand swarm central Christchurch amid reports of a shooting at a mosque in the South Island city, as local media report multiple casualties
— ANI (@ANI) March 15, 2019
एका साक्षीदाराने stuff.co.nz ला दिलेल्या माहितीनुसार आपण प्रार्थना करत असताना गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला. बाहेर येऊन पाहिलं असता आपली पत्नी रस्त्यावर मृत्यूमुखी पडलेली होती. दुसऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलांवर गोळीबार होताना पाहिल्याचं सांगितलं. माझ्या आजुबाजूला सगळीकडे मृतदेह होते असंही त्यांनी सांगितलं.
Jacinda Ardern,NZ Prime Minister on shooting at a Mosque in Christchurch: This is one of New Zealand's darkest days. It was an unprecedented act of violence. Police has apprehended a person, but I don't have further details of him yet. pic.twitter.com/xzTHBjk4Xq
— ANI (@ANI) March 15, 2019
हल्लेखोराने लष्कर जवानांसारखे कपडे घातलेले होते. अशी माहिती आहे. मात्र, अद्याप या माहितीला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान गोळीबारानंतर परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून लोकांना घराबाहेर न येण्याची सूचना केली आहे. तसेच एखादी संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना कळवण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे.
बांगलादेश क्रिकेट संघाच्या प्रवक्त्याने संपूर्ण संघ सुरक्षित असून त्यांना मानसिक धक्क्यात असल्याची माहिती दिली आहे. सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगण्यात आलं आहे.