नीट परीक्षेचा निकाल १६ ऑक्टोबरला! सर्वोच्च न्यायालयाचे दिले निर्देश
![Suicide of NEET student in Tamil Nadu, third incident in four days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/neet-69.jpg)
नवी दिल्ली – राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) यूजी २०२० चा निकाल १६ ऑक्टोबरला घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले आहेत. कोविड -१९ किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असे देखील कोर्टाने म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने १३ सप्टेंबर रोजी परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबर रोजी एकदा परीक्षा देण्याच्या निर्णयाला हिरवी झेंडी दाखवली आहे. देशात नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी ३,४३४ परीक्षा केंद्रांवर आयोजित केली होती. जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एकूण १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र काही विद्यार्थी कोरोना आणि कन्टेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षा देऊ शकले नव्हते. त्यांना १४ ऑक्टोबर रोजी एक संधी मिळणार आहे.