Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
नागरिक्त्व सुधारणा विधेयक म्हणजे ‘Weapons of mass polarization’ : राहुल गांधी
![This advice was given to Congress leader Rahul Gandhi by the Union Minister for Social Welfare](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Rahul-Gandhi.jpg)
नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन म्हणजे ‘Weapons of mass polarization’ आहे. त्यांच्या विरोधात केवळ शांततापूर्ण सत्याग्रह करण्याची गरज आहे, अशी भूमिका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी व्यक्त केली.
“सीएबी’ आणि ‘एनआरसी’ ही भारतातील फॅसिस्टांनी जाहीर केलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाची शस्त्रे आहेत. या गलिच्छ शस्त्रास्त्रांविरूद्ध सर्वोत्तम संरक्षण शांततामय आणि अहिंसक सत्याग्रह आहे. सीएबी आणि एनआरसीविरोधात शांततेत आंदोलन करणार्या सर्वांसोबत मी कायम राहणार आहे, अशा भावना राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.