नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात लसीकरणाची रंगीत तालिम
![Both vaccines are 110 percent safe, DCGI directors believe](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/covid_vaccine-1.jpg)
नवी दिल्ली – सरते २०२० हे वर्ष प्रत्येकासाठीच फार हलाखीचे गेले. या वर्षामुळे सगळेचजण १० वर्षे मागे गेले आहेत. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने प्रत्येकजण कोरोनावरील प्रतिबंध लसीची वाट पाहत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं मह्टलं जात आहे. त्यातच, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचा ड्रायरन म्हणजेच रंगीत तालिम होणार आहे.
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ही माहिती दिली आहे. डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने आत्तापर्यंत ८३ कोटी सीरिंज खरेदी केल्या आहेत. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लसीकरणाचा ड्राय रन पार पडणार आहे. २ जानेवारीपासून लसीकरणाची रंगीत तालिम सुरु केली जाणार आहे असंही सोमानी यांनी सांगितलं. देशातील सर्व राज्यांमध्ये हा ड्राय रन पार पडणार आहे.