breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

धक्कादायक! घरासमोर खेळत असलेल्या चिमुरड्यांना पिकअप व्हॅनने चिरडले, 7 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी  तालुक्यात भरधाव पिक अप व्हॅनने घरासमोर खेळत असलेल्या 3 लहान मुलांना चिरडण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एका 7 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे इथं घटना शुक्रवारी रात्री ही घटना घडलेली आहे.

आष्टी-गोंडपिंपरी मार्गावर ही मन हेलावून टाकणारी अपघाताची रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान घटना घडलेली आहे. या मार्गावर पंढरी मेश्राम यांचे घर आहे. घरासमोर अलेशा मेश्राम (7), अस्मित मेश्राम (10) आणि माही रामटेके (12) हे तीन लहान मुलं खेळत होती. त्यावेळी या मार्गावरुन मालवाहतूक करणारी एक पिकअप व्हॅन भरधाव वेगाने जात होते. पंढरी मेश्राम यांच्या घराजवळ पिक अप व्हॅन चालवणाऱ्या चालकाचा अचानक ताबा सुटला आणि गाडी थेट मेश्राम यांच्या अंगणात शिरलेली आहे.

यावेळी घरासमोर खेळत असलेल्या अलेशा, अस्मित आणि माही यांना जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, भरधाव पिकअप व्हॅनने त्यांच्या घरासमोरील भिंती, रस्त्यावरील खांबाला धडक देत उलटला. या धडकेत पिकअप व्हॅनने रस्त्यावरील पोलही आडवे केले. या धुमश्चक्रीत ही तीन लहान चिमुरडी सापडली. पिकअप व्हॅनच्या धडकेत अलेशा मेश्रामचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर अस्मित मेश्राम (10) आणि माही रामटेके (12) हे गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. चिमुरडी मृत्यूमुळे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थिती लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होत. स्थानिकांनी जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केलेले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आलेली असून गोंडपीपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button