Breaking-newsआंतरराष्ट्रीय

भारतानंतर अमेरिकेतही TikTok वर बंदी

वॉशिंग्टन : चीनला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतानंतर अमेरिकेत TikTok वरही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की सुरक्षेचा धोका लक्षात घेता आम्ही TikTok बंदी घालत आहोत.

‘जिथपर्यंत TikTok चा प्रश्न आहे, आम्ही त्यावर बंदी घालतोय’. भारताने केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेत चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. अनेक खासदार आणि एजन्सींनी TikTokवर हेरगिरी आणि डेटा चोरीचा आरोप केला. ज्यानंतर आता अमेरिकेनेही TikTok बंदी घातली आहे.

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते, आम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही TikTok वर बंदी घालू शकतो, तसेच आम्ही इतर काही पर्यायांवर विचार करीत आहोत. परंतु तो कोणत्या पर्यायांविषयी बोलत आहे हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्याचवेळी दोन प्रमुख अमेरिकन वृत्तपत्रांनी असा दावा केला आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत बाइटडान्सला सांगितले, TikTok अमेरिकेच्या ऑपरेशन्सला देण्यात यावे. मायक्रोसॉफ्ट TikTok ची खरेदी करण्यासाठी सर्वात पुढे आहे. या दोन कंपन्यांमध्ये वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत. परंतु, दोघांनीही याला दुजोरा दिलेला नाही.

दरम्यानस लडाख हिंसाचारानंतर भारताने कारवाई करताना TikTok सह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. तेव्हापासून अमेरिकेत TikTokवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली होती. अमेरिका TikTokला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे मानत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ अनेक नेत्यांनी या बंदीबद्दल बोलले होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button