Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

फायर नहीं वाइल्डफायर है! नितीश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक!

IND vs AUS | भारताचा २१ वर्षीय तरूण खेळाडू नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध मेलबर्न कसोटीत आपले पहिले कसोटी शतक झळकावले आहे. नितीश रेड्डीने 99 धावांवर असताना बोलँडच्या गोलंदाजीवर दणदणीत चौकार लगावत आपलं कसोटी शतक पूर्ण केलं. नितीश कुमार रेड्डीने १७६ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह १०५ धावांची खेळी केली.

नितीश रेड्डी ९७ धावांवर असताना वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. यानंतर मैदानात आलेला जसप्रीत बुमराह २ चेंडू खेळत बाद झाल्याने ८वी विकेट पडली. यानंतर मोहम्मद सिराज मैदानावर आला. मोहम्मद सिराज किती चेंडू खेळू शकेल, याची सर्वांनाच चिंता होती. पण सिराजने बचावात्मक फलंदाजी करत कमिन्सचं षटक खेळून काढलं आणि पुढच्या षटकात नितीश रेड्डीला स्ट्राईक दिली. नितीश रेड्डीने एक डॉट बॉल खेळत पुढच्या चेंडूवर चौकार लगावत शतकाचं स्वप्न पूर्ण केलं.

हेही वाचा     –      अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन प्रसिद्धी मिळवणं थांबवा; अमेय खोपकरांनी सुरेश धस यांना सुनावलं 

२१ वर्षीय नितीश रेड्डीच्या शतकामुळे भारताने चांगली धावसंख्या उभारली आहे. नितीश रेड्डीने वॉशिंग्टन सुंदरबरोबर १२७ धावांची मोठी भागीदारी रचली. सुंदर आणि नितीश रेड्डीची ही ८व्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताची दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. वॉशिंग्टन सुंदरनेही नितीशच्या जोडीने अर्धशतक पूर्ण केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button