धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार; आरोपींनी कंबर, पाय तोडलेल्या पीडितेचा मृत्यू, बलरामपूर येथील घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/rape-11.jpg)
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश राज्यात हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरण ताजे असताना अशाच पद्धतीची घटना पुन्हा एकदा घडलेली आहे. उत्तर प्रदेशमधील बलरामपुर जिल्ह्यातील गैसडी येथील एका गावात एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे. आरोपींनी पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिची कंबर आणि पाय तोडले. उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना पीडितेचा मृत्यू रस्त्यातच झालेला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी 29 सप्टेंबरच्या सकाळी आठ वाजता आपल्या घरुन कॉलेजला अॅडमिशन घेण्यासाठी गेली. या वेळी तिचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी पीडिता बेशुद्ध (स्वनियंत्रण गमावलेल्या) अवस्थेत घरी पोहोचली होती. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला दुसऱ्या दवाखण्या घेऊन जाण्यास सांगितलेले आहे. दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना पीडितेचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. दरम्यान, बलरामपूरचे जिल्हाधिकारी हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप होत आहे. दुसऱ्या बाजूला पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पीडितेवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे.
पीडितेच्या आईने आरोप केलाआहे की, पीडिता जेव्हा डिग्री कॉलेजमध्ये गेली तेव्हा तिचे काही मित्र तिला घेऊन आपल्या ई रिक्षातून मार्केटमधील एका खोलीत घेऊन गेले. तिथे त्यांनी तिला एक इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेची कंबर आणि दोन्ही पाय तोडले. त्यानंतर त्यांनी मुलीला बेशुद्धावस्थेतच रिक्षात बसवून घरी पाठवून दिले. ती जेव्हा घरी पोहोचली तेव्हा ती बोलू शकली नाही. ती रडत कसेतरी इतकेच म्हणाली की, ‘ मम्मी मुझे बचा लीजिए, मैं मरना नहीं चाहती हूं’ दरम्यान, पीडितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झालेले आहे. मृतदेह पीडितेच्या नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आलेला आहे. सूत्रांचया हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात पीडितेवर बलात्कार झाल्याचे म्हटलेले आहे. पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक होती. पीडितेच्या शरीराच्या अंतर्गत आणि बहिर्गत भागावार जखमा झालेल्या होत्या. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.