Breaking-newsताज्या घडामोडी
दोन काय चार बायका सांभाळू शकतो, शिवसेना खासदाराकडून राम शिंदेंना प्रत्युत्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/lokhande-sadashiv-kisan-34643.jpg)
अहमदनगर : “हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे”, अशी खरमरीत टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केलेली होती. या टीकेला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो, असे आमचे नेते आहेत, असे सदाशिव लोखंडे म्हणालेले आहेत.
“दुधाचे शेतकरी व्याकूळ झाले आहे. त्यांना पैसे मिळत नाही ही खरी गोष्ट आहे. मात्र दुधाच्या पदार्थांना देखील भाव मिळत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सबसिडी दिली पाहिजे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे,” अशी मागणी लोखंडे यांनी केलेली आहे.